इंद्रायणी एक्स्प्रेस नावाची एक ट्रेन मुंबई-पुणे दरम्यान धावते. तीच पुढे वाढवून पुणे-सोलापूर अशी धावते. सुरुवातीला प्रायोगिक तत्वावर चालणारी ही गाडी आता कायम स्वरूपी धावते. या गाडीला सध्या आंतर्नगरी (intercity) असे नाव आहे. भीमा ही पवित्र नदी सोलापूर जिल्ह्याची प्रमुख नदी असून इंद्रायणीचे पाणीसुद्धा भीमेलाच येते. म्हणून पुणे-सोलापूर-पु णे दरम्यान धावणाऱ्या या गाडीला भीमा एक्स्प्रेस असे नाव देणे उचित ठरेल.