मनमाड-इंदूर रेल्वेमार्गाच्या अलायमेंटमध्ये बदल होणार
धुळे । प्रतिनिधी
मनमाड-मालेगाव-धुळे-इंदूर रेल्वेमार्गाचे तीन वेळेस सर्वेक्षण झाल्यानंतर पुन्हा चौथ्यांदा सर्वेक्षण हे अन्यायकारक असल्याचे रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या लक्षात आणून दिले. यावर रेल्वेमंत्र्यांनी सांगितले की, सॅटेलाईटवर मनमाड-मालेगाव-धुळे-इंदूर रेल्वेमार्गाची पाहणी केली असता काही ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाल्याचे दिसून आले आहे. यासाठी रेल्वेमार्गाची अलायमेंटमध्ये बदल होण्याची श्नयता असल्याने पुनर्रसर्वेक्षणाचा निर्णय घेण्यात आल्याचे ना. प्रभू यांनी सांगितले, अशी माहिती आ.अनिल गोटे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.
आ....
more... गोटे म्हणाले की, मुंबई मेट्रो 3 साठी जवळजवळ अडीच हजार घरे विस्थापित होत आहेत, तरीही आपण मेट्रो प्रकल्प 3 करीत आहोत. मग, हा निकष केवळ आमच्याच मनमाड-मालेगाव-धुळे-इंदूर रेल्वेमार्गासाठीच का लावला जातो. आम्ही 1982 सालापासून या मार्गासाठी लढत आहोत. प्रचंड मोठे आंदोलन झाले. तीन-तीन सर्व्हे झाले, तरीसुद्धा आम्हाला कुणी वाली नसल्याने आम जनतेत अन्यायाची भावना निर्माण झाली, याकडे लक्ष वेधले. सर्वात महत्वाची बाब म्हणजे ‘रोड ऑन रेल’ ने कोकण रेल्वेला आर्थिक सुबत्ता प्राप्त करुन दिली. तोच निकष मनमाड-मालेगाव-धुळे-इंदूर रेल्वेमार्गाला लावल्यास मनमाड-इंदूर रेल्वेमार्गसुद्धा फायद्याचा ठरू शकतो, असे रेल्वेमंत्र्यांच्या लक्षात आणून दिल्यानंतर या मुद्याचा सखोल अभ्यास करण्याचे मान्य केले. रेल्वेमंत्र्यांनी आपण रेल्वेमार्गाची वृत्तपत्रात चर्चा केल्याबद्दलची कात्रणे मी वाचली असल्याचे सांगताच आ. गोटे यांनी आपला कुणी गैरसमज करुन दिला असल्याचे सुस्पष्ट करुन अन्य कुणापेक्षाही मनमाड-इंदूर रेल्वेमार्गाचा ‘रेट वे’ संदर्भात मी जबाब देण्यासाठी बांधलेलो आहे. योगायोगाने नव्हे! असे लक्षात आणून दिले असता रेल्वेमंत्र्यांनी मनमोकळपणे मान्य केले. तसेच कुणी माझ्याविरुद्ध काय सांगितले याच्याशी मला काही घेणे-देणे नाही. पण, मी मात्र कुणाबद्दल एका शब्दानेसुद्धा तक्रार करणार नाही. कारण, मला रेल्वेमार्ग हवा आहे. बाकी राजकारणाशी काही घेणे देणे नाही!
#ManmadIndoreRail #ManmadIndore #मनमाडइंदूर
click here